शाळा विकास मंच

शाळा विकास मंच जळकी (व ) ता. सिल्लोड जि.प.प्रा शा जळकी (व) या शाळेत चांगल्या दर्जाची शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यासाठी लोकसहभाग चळवळ उभी करण्यात आली आहे त्यासाठी शाळा विकास मंच जळकी (व ) स्थापन करण्यात आला आहे.

    या समितीत कोणी अध्यक्ष , उपाध्यक्ष ,सचिव वा पदाधिकारी नसून आपण सर्व तरुण मंडळ,पालक, ग्रामस्थ माता भगिनी या सदस्य आहेत. सर्व सदस्यांना समान दर्जा असून शाळा विकासासाठी सर्वांचे मत व विचार विचारात घेऊन हि समिती कार्य करते.

    लोकसहभागातून ४ ते ५ लक्ष रु निधी जमा करून शाळेत डिजिटल बालवर्ग, डिजिटल कलासरुम , २५ संगणक ची अद्यावत computer Lab साठी साहित्य  विविध शैक्षणिक व खेळाचे साहित्य व शाळेला आवश्यक त्या इतर साहित्य व भौतिक सुविधा निर्माण करण्याचे काम या समितिने हाती घेतले आहे.

     लोकसहभागातून जमा होणारा निधी संकलनासाठी व पारदर्शक व्यवहारासाठी समितीचे बँक खाते उघडण्यात आले असून या खात्यावर जमा होणारा सर्व निधी जमा करून समिती सदस्य यांच्या विचाराने व मान्यतेने शाळा विकास व विद्यार्थी विकासावरच खर्च करण्यात येतो.

नम्र अवाहन
कृपया सर्व दाते , पालक व माजी विद्यार्थी , दानशुर व्यक्ती व संस्था , ग्रामस्थ जळकी (व ) विनंती कि आपणही या ज्ञान यज्ञात आपला देणगीरुपी सहभाग नोंदवावा हि नम्र विनंती.
   आपण आपली देणगी वरील बँक खात्यावर online जमा करु शकता किंवा शाळेच्या कार्यालयात  कॅश जमा करून पावती घेऊ शकता. 


आता पर्यंतचे आमचे देणगीदार             
        जळकी (व ) च्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून जि प प्रा शा जळकी  या शाळेत भौतिक सुविधा  निर्माण करणेसाठी खालील दानशूर देणगीदार यांनी देणगी जाहीर करून प्रत्येक्ष खात्यावर जमा केली.  विकास मंच जळकी (व )  च्या  सर्व देणगणीदार यांचेतर्फे  खूप खूप आभार व धन्यवाद ....!!!!!





निधी संकलन प्रसंगी सर्व सन्मानीय देणगीदार  ....!!

No comments: